संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST2021-04-04T04:14:50+5:302021-04-04T04:14:50+5:30

सिडको : नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ आहे. ...

Kovid Center should be set up at Sambhaji Stadium | संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारावे

संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारावे

सिडको : नाशिक पश्चिम मतदारसंघातील सिडको व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ आहे. या सर्व बाबींचा सारासार गांभीर्यपूर्वक विचार करून संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक शहरात व सिडको परिसरात रोजच कोविड संसर्गाने रुग्णसंख्या वाढत आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात सिडको, पाथर्डी फाटा, अंबड गाव, कामटवाडे या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहत असून या परिसरातील नागरिकांना झाकिर हुसेन, बिटको हॉस्पिटल या ठिकाणी जावे लागते. सदर कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच त्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. सिडको परिसरात असे मोठे कोविड सेंटर नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करीत रुग्णाची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत असल्याचा अधोरेखित करीत त्यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे. तसेच या गंभीर परिस्थितीचा विचार करून सिडकोतील संभाजी स्टेडियम येथे कोविड सेंटर त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Kovid Center should be set up at Sambhaji Stadium