कोकणकडा, घाटघरला दाट धुक्यामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 05:54 PM2019-07-29T17:54:50+5:302019-07-29T18:35:01+5:30

भंडारदरा : पर्यटकांना खबरदारीच्या सूचना

Kokkadri, the main threat to the pier | कोकणकडा, घाटघरला दाट धुक्यामुळे धोका

कोकणकडा, घाटघरला दाट धुक्यामुळे धोका

googlenewsNext
ठळक मुद्देनिसरड्या वाटेवरून पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी-घोटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसून येत आहे. त्यातच भंडारदरा धरण परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत. पावसामुळे भंडारदरा परिसरातील कोकणकडा, घाटघर भागात मोठ्या प्रमाणावर धुके दाटून येत असल्याने वाहनचालकांनी उडरावणे येथूनच माघारी फिरावे, असे आवाहन भंडारदरा वन्यजीव विभागाने केले आहे.
पावसाच्या संततधारेमुळे इगतपुरीसह भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. वीकेंडला तर गर्दीवर नियंत्रण मिळविणे मुश्किल बनले आहे. विशेषत: पांजरे, नान्हे, नेकलेस, गडईआई धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वन्यजीव विभागाने परिसरातील पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीमार्फत स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शेंडीनाका, मूतखोलनाका येथेही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धबधब्यातील पाणी थेट भंडारदरा धरणात जाऊन पोहोचत असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. अशा स्थितीत पर्यटकांनी धबधब्याजवळ जास्त जाऊ नये. लहान मुलांना सांभाळावे. निसरड्या वाटेवरून पाय घसरुन अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पावसामुळे दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. पर्यटकांनी वाहने रस्त्याच्या बाजूला लावावीत. जंगलात किंवा कच्च्या रस्त्यांवर वाहने नेऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय, कोकणकडा, घाटघर आदी परिसरात धुके दाटून येत असून त्यामुळे वाहनांचे अपघात घडण्याची भीती आहे. अशावेळी वाहनधारकांनी उडरावणे येथूनच माघारी फिरावे, असे वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोन्नर यांनी कळविले आहे.

Web Title: Kokkadri, the main threat to the pier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.