शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST

--------------------------------- तहसील आवारात पार्किंगची गैरसोय मालेगाव:- तहसील कार्यालयाच्या आवारात पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कार्यालय आवारात ...

---------------------------------

तहसील आवारात पार्किंगची गैरसोय

मालेगाव:- तहसील कार्यालयाच्या आवारात पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कार्यालय आवारात सध्या ग्रामपंचायत निवडणूक साहित्य वाटपासाठी मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अडचण होत आहे. वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

-----------------------------------------

मालेगावी डासांचा उपद्रव

मालेगाव: शहरात डासांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात डास आढळून येतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दैनंदिन फवारणी, प्रतिबंध औषधांची फवारणी केली जात नाही. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. महापालिकेने शहरात तातडीने प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

---------------------------------------------

टेहरे चौफुली बनली मृत्यूचा सापळा

मालेगाव:- शहरालगतची टेहरे चौफुली मृत्यूचा सापळा बनली आहे. टेहरे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते तसेच ३० ते ४० खेड्यांचा संपर्क रस्ता म्हणून हा रस्ता ओळखला जातो. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

--------------------------------------------------

स्टेट बँक चौकात वाहतूक कोंडी

मालेगाव: शहरातील स्टेट बँक चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याठिकाणी स्टेट बँक शाखेसह दोन हॉटेल असल्याने नेहमीच वर्दळ असते. मात्र वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. याठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.

------------------------------------------------------------

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता

मालेगाव:- सोयगाव ते सब स्टेशन दरम्यानचा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा झाला आहे. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालता येत नाही. वाहनधारक कसरत करीत वाहने हाकत आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेने तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.