भरधाव ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार : बोधलेनगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 16:08 IST2017-09-28T16:07:23+5:302017-09-28T16:08:34+5:30
दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील मुख्य महामार्गावरून एक इसम रस्ता ओलांडत होता. दरम्यान, अज्ञात ट्रकने भरधावपणे वाहतूक करीत सदर इसमाला धडक दिली.

भरधाव ट्रकच्या धडकेत इसम जागीच ठार : बोधलेनगर
नाशिक : पुणे महामार्गावरून जाणाºया भरधाव ट्रकने एका अनोळखी ५२ वर्षीय इसमाला रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली. या धडके त गंभी जखमी झालेल्या इसमाचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील मुख्य महामार्गावरून एक इसम रस्ता ओलांडत होता. दरम्यान, अज्ञात ट्रकने भरधावपणे वाहतूक करीत सदर इसमाला धडक दिली. धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेला इसम रस्त्यावर अत्यवस्थ अवस्थेत पडलेला असताना ट्रकचालकाने त्याला रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. जखमी अवस्थेत मदतीसाठी याचना करणारा अज्ञात इसमाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले; मात्र रस्त्यातच तो मरण पावला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. याप्रकरणी अधिक तपास हवालदार रवींद्र मुंतोडे करीत आहेत.