शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

मुलांना मोबाईल गेमचे व्यसन भाग्यश्री मुळे

By admin | Published: July 26, 2014 9:30 PM

मुलांना मोबाईल गेमचे व्यसन भाग्यश्री मुळे

 नाशिक,  : हल्लीच्या स्मार्ट पिढीतल्या मुलांच्या स्मार्ट मोबाइलवर गेम खेळण्याच्या स्मार्ट वेडाचा आर्थिक दणका पालकांना सहन करावा लागत आहे. आई, बाबा, दादा, ताईचा स्मार्टफोन थोड्या वेळासाठी हातात मिळत असला तरी त्यावर गेम खेळणे, चॅटिंग करणे, इंटरनेटचा वापर करुन निरनिराळया शंकांचे निरसन करुन घेणे हे प्रकार लहान मुलांकडून मोठ्या प्रमाणात होत आहेत. मुले इंटरनेटवरुन जे गेम डाऊनलोड करतात, ते फ्री असले आणि ते खेळतानाही कोणतेही शुल्क लागत नसले तरी त्या खेळाच्या पुढच्या पायऱ्या चढताना गेमच्या आॅपरेटर्सकडून लेव्हल, अवॉर्डची मागणी करुन मुले पालकांच्या नकळत पैशांचे व्यवहार करीत आहेत. विशेषत: कॅँडीक्रश सारख्या गेममध्ये लेव्हल व अवॉर्डसाठी पैसे लागले तरी मुलांना त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. या सगळ्यात पालकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.खेळण्याच्या नादात पैशांचा फटकामुले जरी पालकांच्या मोबाइलवर किंवा स्वत:च्या मोबाइलवर गेम खेळत असली तरी खेळण्यात ती इतकी गुंग असतात की खेळता खेळता कुठलेही आॅप्शन आले, जाहिराती आल्या तरी त्यावर क्लिक करुन मोकळे होतात. जर त्या मोबाईलवर नेट बॅँकींगचे कनेक्शन आॅन असेल, ते बार्टर करुन ठेवले असेल तर त्यानुन परस्पर पैसे कट होतात. पालकांच्या ते लक्षातही येत नाही. गेम खेळता खेळत फ्री अ‍ॅप्स असे म्हणून काय काय पुढे येत असते. मुले खेळात अडथळा नको म्हणून त्यावर क्लिक करुन मोकळे होतात. ते डाऊनलोड होत रहाते, मोबाईलवर इंटरनेट कनेक्शन पोस्टपेड असेल तर त्याचे चार्जेस बिलात लागुन येतात. प्रिपेड असेल तरी ते नकळत कंपन्या वसूल करतात. मोबाइलवरचे गेम फ्री असतात. पण त्या गेमच्या पुढच्या पायऱ्या खेळताना पैसे पडतात. पॉवर्स विकत घेण्यासाठी, लाईफ वाढवण्यासाठी, लाईकची संख्या वाढवण्यासाठी पैसे पडतात. उदा. कॅँडीक्रश खेळात पॉवर्स घ्यायची असेल तर ५५ रुपये पडतात. मोबाइलवर कॅँडी क्रश किंवा दुसरा एखादा गेम खेळत असाल आणि अर्धातास झाला तर तो गेम आॅपरेट करणाऱ्या कंपन्या गेम पुढिल अर्ध्यातासासाठी स्टॉप करतात. त्यांचा तो नियमच असतो. पण आपल्याला खेळात व्यत्यय नको असेल तर तुम्ही लाईफची डिमांड करु शकता. म्हणजे ठराविक रक्कम मोजून लाईफ वाढवून घेऊ शकता. गेम प्रमाणेच प्ले स्टोअरला काही फ्री अ‍ॅप्स असतात, काही पेड अ‍ॅप्स असतात. बऱ्याचदा आपल्याला या दोघांमधला फरकच समजत नाही. पेड अ‍ॅप्स चुकून डाऊनलोड होतात आणित्याचे चार्जेस लागू होतात. याचे तात्काळ दिसणारे दृष्य परिणाम म्हणजे मोबाइल वापरकर्ता (पालक, मुले) यांच्या मोबाईलचे नेटपॅक लवकर संपते. इतक्या लवकर नेटपॅक कसे संपले असा समोरच्याला प्रश्न पडतो. इंटरनेटचे कनेक्शन पोस्टपेड असेल तर त्याचे बिल वाढते. अव्वाच्या सव्वा बिल पाहून आपल्याला घाम फुटतो. पण हे सारे गेम आणि अ‍ॅप्सचे प्रताप असतात.मुलाचा प्रताप पाहून पित्याला घामसातपुर येथील रहिवासी असलेल्या संदीप शर्मा यांच्या मुलाने त्यांच्या मोबाईलवरुन एका आयओएस गेमवर ३००० रुपये खर्च करुन टाकले. गेम डाऊनलोड करण्यासाठी त्यांचा मोबाइल वापरला गेला. आपण एवढे बिल येईल इतके कॉलही केले नाही, मेसेजही पाठवले नाही मग इतके बिल कसे आले असा त्यांना प्रश्न पडला. संबंधित कंपनीच्या आॅफिसमध्ये जाऊन चौकशी केल्यावर तुमच्या मोबाईलवरुन डाऊनलोड केलेला गेम आणि त्याचे लेव्हल, अवॉर्ड याचे ते चार्जेस असल्याचे लक्षात आले. मुलाला ओरडून काही उपयोग नव्हता कारण बिल तर भरावेच लागणार होते. पण मोबाइल मुलापासून दुर ठेवावा, इंटरनेट कनेक्शन वेळच्या वेळी बंद करावे असे त्यांनी ठरवून टाकले. या खेळांमध्ये पैशांच्या खर्चाची वास्तविक सीमारेषा धूसर असते. कंपन्या पालकांना माहिती देत नाही.अशी घ्या काळजीगेमवर नजर ठेवावी - अव्वाच्या सव्वा बिल टाळण्यासाठी या गेम खरेदीचा तपशील असतो. गेमच्या इंटरफेसवर थांबल्यास समजते की, चार्ज लागणे कधी सुरु होईल.डिजीटल अलाउन्स- अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनने डिजिटल स्टोअरमध्ये मुलांचे अलाउन्स निश्चित करण्याची सुविधा पालकांना दिली आहे. अलाउन्सच्या सीमेवर पोहोचल्यावर युजर्स पुढची खरेदी करु शकत नाही.खरेदी टाळावी- अव्वाच्या सव्वा बिल टाळण्यासाठी अ‍ॅपच्या खरेदीची सिस्टीम निकामी करुन टाकावी. आपल्या डिव्हाइसच्या सेटिंग स्क्रिनवर खरेदीचा पर्याय आॅन आॅफ ठेवावा.मोबाइलवर गेममुळे अभ्यासाला सुट्टीमोबाईल गेमशी मुलांना लागलेला लळा पालकांना सर्वच दृष्टीने महाग पडू लागला आहे. या गेमच्या व्यसनापायी मुले तासनतास एकाच जागी बसून स्वमग्न होऊ लागली आहे. गेमच्या नातात त्यांना जगाचे भानही राहिलेले नाही. अभ्यास, बौद्धिक खेळ, मैदानावरचे खेळ, घरकामात मदत, घरातील ज्येष्ठांना मदत या सारख्या गोष्टी करण्याऐवजी त्यांचा सगळा वेळ मोबाइल गेम खेळण्यात जात आहे.लहान वयातच स्मार्ट फोनची डिमांडघरातील आई वडिल, दादा, काका, काकू यांचे मोबाइल ते सकाळी किंवा संध्याकाळी घरी आल्यावरच हाताळायला मिळत असल्याने मुले काहीशी नाराज होत आहे. शाळेत किंवा क्लासमध्ये मोबाईल आणू दिला जात नसल्याने तो हाताळायला वेळही कमी मिळत असल्याने मुले चिडचिडी झाली आहे. अर्थात काही मुले शाळेच्या या नियमांना न जुमानता सर्रास मोबाइल जवळ बाळगत आहेत व इतर मुलांनाही मोबाइल गेमचे वेड लावत आहेत. यामुळे अध्ययन, अध्यापनात व्यत्यय आणत आहे. पुर्वी महाग असणाऱ्या स्मार्ट फोनच्या किंमती आता कमी झाल्याने मुलेही स्मार्ट फोनची मागणी करु लागले आहेत. एकुलती एक किंवा लाडाकोडाची गोड बोलून इमोशनल ब्लॅकमेल करणारी मुले पालकांना आपले हट्ट पुरे करण्यास भाग पाडत आहे. शाळेत वा क्लासला मोबाइल नेणार नाही अशी कबुली देत असल्याने मुलांचे हे हट्टही पुर्ण केले जात आहे. मात्र पालकांच्या मोबाईलवरुन डाऊनलोड करुन घेतलेल्या गेमचे बिल पाहून पालक आता हैराण झाले आहेत.ंखोटीखोटी तीनपत्ती आणि खरेखुरे पैसेमोबाइलवर तीनपत्ती हा गेम सध्या खुप हिट आहे. मुले आम्ही हा गेम खोटाखोटा खेळतो, यावर पैसे लावत नाही असे म्हणतात. पण हल्ली प्रत्यक्षात या गेमच्या माध्यमातुन पैशांचे व्यवहार सुरु झाले आहेत. हा गेम खेळणाऱ्याकडचे सगळे पैसे संपून गेले आणि त्याचे स्टेटस झिरो बॅलन्स असे झाले की समोरचा त्याला काही पैसे उधार देतो. म्हणजे तो या गेममध्ये फंड ट्रान्सफर करतो. पण असे करताना ज्याला फंड दिला त्याच्याकडून खरोखरचे पैसेही घेण्याचे प्रकार हल्ली होऊ लागले आहेत. ५० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत पैशांची देवाणघेवाण होते आहे. आणि यात मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलेही काही प्रमाणात सक्रीय असल्याचे समोर आले आहे.कंपन्या करतात फसवणूकअ‍ॅपलचा आयफोन आणि अ‍ॅमेझॉनचे किंडल फायरसारख्या डिव्हाइससाठी मुले पालकांच्या फोनवरुन मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत.बहुतांश गेम नि:शुल्क डाऊनलोड केले जातात परंतू, नवे लेव्हल, पुरस्कारांसाठी खर्च करणे सुरु होते. कंपनीच्या भ्रामक बिलींग सिस्टीमने मुलांसाठी दीर्घकाळासाठी अनधिकृत खरेदी सोपी करुन ठेवली आहे.हाईक दाखवते पैशांची लालुचहल्ली अनेकाच्या इमेल्सवर लाईकइंडे, हाईक्स अशा नवनवीन प्रकारांचे मेल्स, मेसेजेस येऊ लागले आहेत. यात बहुतांशी जाहिराती आणि फ्रेंड रिक्वेस्टचा भरणा असतो. हाईकला नवनवीन मित्र जोडले जावे यासाठी एखाद्याने हाईकचे २०, ३० मॅसेज पाठवले आणि त्यापैकी काही जणांनी ते स्विकारले तर हाइक त्याच्या बदल्यात त्याला विशिष्ट रकमांचा मोबाइल रिचार्ज मारुन दिला जात आहे. म्हणजे ५ फ्रेंड जोडले तर ५० रुपये ते ११० रुपये रिचार्ज मारुन दिला जातो. विशिष्ट कालावधीसाठी टॉकटाईम फ्री दिला जातो. यातुन त्यांना एकप्रकारे मार्केटिंगचे वेड लावले जाते. पैसे मिळताय म्हणून एखादा नुसते मॅसेजेस पाठवत रहातो पण त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्याच परिचयाच्या लोकांना यातुन त्रास देतो आहे आणि त्यांची नाराजी ओढवून घेत आहोत.मोबाईलवरचे मुलांना आवडणारे गेम-कॅँडीक्रश, स्रेक, रेस, बर्न इट आऊट, ड्रॉप लीटज डिलाईट, बर्न द रोप, बॉम्ब टॉस, ब्लॉक ब्रेकर्स, क्रिकेट वर्ल्ड, स्पीड रेसींग, अ‍ॅँग्री बर्ड, टेम्पल रन, सबवे, फुटबॉल, सॉकर, तीनपत्तीवेब बुक्स- शॉप फॉर फ्री अ‍ॅँड पेड बुक्स हा प्रकारही मुलांना आवडतो.ं