शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या संदर्भ रुग्णालयात लवकरच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:23 IST

नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.यासंदर्भात आमदार जयंत जाधव यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग कागदोपत्रीच ...

ठळक मुद्देदीपक सावंत : विधिमंडळ अधिवेशनात घोषणा रुग्णालयात डायलिसीससाठी दरदिवशी २० रुग्णांची प्रतीक्षा यादी

नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.यासंदर्भात आमदार जयंत जाधव यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग कागदोपत्रीच चालू आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळालेली असूनही यासाठी आवश्यक नेफ्रॉलॉजिस्ट, तंत्रज्ञ, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पूर्तता झालेली नाही. या रुग्णालयात डायलिसीससाठी दरदिवशी २० रुग्णांची प्रतीक्षा यादी असून, तीन सत्रात डायलिसीस करण्यासाठी रुग्णालयास १० डायलिसीस यंत्रे व डायलिसीस खुर्च्यांची तसेच आवश्यक मनुष्यबळाची निकड आहे. तसेच अमरावतीच्या संदर्भ सेवा रुग्णालयाप्रमाणे नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये प्लास्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी आणि पेडियाट्रिक आदी विकारांवरील विभाग सुरू करण्यासाठी येथे दोन मजले वाढवून २०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मंजूर आकृतिबंधाप्रमाणे ३६७ पदांपैकी ९२ पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या रुग्णालयातील अतिविशेषोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका इ. शंभरावर पदे रिक्त आहे. तसेच सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. येथील कामाचा व्याप लक्षात घेता आकृतिबंधाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात वैद्यकीय व शुश्रूषा संवर्गातील परिचारिकांची पदे नव्याने निर्माण करून सदर पदे भरण्याबाबत विभागीय उपसंचालकांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रुग्णालयाचे २०० बेडमध्ये रूपांतर करण्याची गरज असून, येथील मूत्रपिंड शस्त्रक्रिया विभाग लवकरत लवकर सुरू करण्यासाठी शासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड शस्त्रक्रिया येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू करण्यात येईल, असे त्यांनी आमदार जाधव यांना आश्वासित केले. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील रुग्णांना मूत्रपिंड शस्त्रक्रिया करण्यासाठी लवकरच नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा जिल्ह्यातील अनेक रुग्णांना फायदा होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक