पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:14 IST2017-11-19T01:13:53+5:302017-11-19T01:14:43+5:30
नाशिक : पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि़१६) सायंकाळच्या सुमारास घडली आहे़

पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अपहरण
दोन अल्पवयीन बहिणींचे अपहरण
नाशिक : पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि़१६) सायंकाळच्या सुमारास घडली आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शक्तीनगरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसरात राहणाºया अपहृत बहिणींपैकी मोठी ही १६ वर्षे पाच महिने व लहान बहीण ही १४ वर्षे ३ महिने वयाची आहे़ या दोन्ही बहिणींच्या अपहणाबाबत परिसरातील काही युवकांबाबत संशय व्यक्त केला जातो आहे़ दरम्यान, या प्रकरणी अपहृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहरात सद्यस्थितीत अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.