आर्थिक व्यवहारातून दोघांचे अपहरण, आडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा
By नामदेव भोर | Updated: September 23, 2022 15:45 IST2022-09-23T15:44:47+5:302022-09-23T15:45:34+5:30
आडगाव शहरातील हनुमाननगर पार्क साईड येथे राहणाऱ्या दोघा व्यक्तींच पाच संशयतांनी आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आर्थिक व्यवहारातून दोघांचे अपहरण, आडगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा
नाशिक :
आडगाव शहरातील हनुमाननगर पार्क साईड येथे राहणाऱ्या दोघा व्यक्तींच पाच संशयतांनी आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धर्मा भालेराव (४५), व महेश गायकवाड (४०) असे अपहरण झालेल्या व्यक्तींचे नाव आहे. या घटनेबाबत योगेश भालेराव यांचा मुलगा रोहन भालेराव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विनय व त्याचे चार साथीदार यांच्यावर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विनय व त्याच्या इतर चार साथीदारांनी गुरुवारी सकाळी ११ वाजेपूर्वी रोहन याचे वडील योगेश भालेराव व आत्या भाऊ महेश गायकवाड यांचे पैशाच्या कारणावरून अपहरण करून पैसे मिळाले नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर करत आहेत.