रामवाडीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण
By Admin | Updated: April 1, 2017 20:59 IST2017-04-01T20:59:52+5:302017-04-01T20:59:52+5:30
पंचवटीतील रामवाडीत राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचे अपहरण

रामवाडीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण
नाशिक : पंचवटीतील रामवाडीत राहणाऱ्या तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि़३१) सकाळच्या सुमारास घडली़ पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी ८ वाजेच्या सुमारास या मुलीचे अज्ञात इसमाने आमिष दाखवून फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची फिर्यादित म्हटले आहे़ मुलीचा कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने अखेर रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मुलीच्या वडिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली़