अल्पवयीन मुलीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:17 IST2021-09-12T04:17:10+5:302021-09-12T04:17:10+5:30

------------------ मालेगावातून दोन दुचाकी लंपास मालेगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील मोहम्मद अली रोड परिसरातून ५० ...

Kidnapped a minor girl | अल्पवयीन मुलीला पळविले

अल्पवयीन मुलीला पळविले

------------------

मालेगावातून दोन दुचाकी लंपास

मालेगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील मोहम्मद अली रोड परिसरातून ५० हजार रुपये किमतीच्या दुचाकीला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी फरीद अहमद हुसेन यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम एच ४१ ए डब्लू ०९९८ अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे करीत आहेत. तर पवारवाडी भागातून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरणाऱ्या संशयित अब्दुल रहीम मोहम्मद मोहम्मद सलीम (२३), रा. पवारवाडी याला पवारवाडी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शफिक अहमद शब्बीर अहमद यांनी फिर्याद दिली. बिस्मिल्ला बाग परिसरातून त्यांच्या मालकीची एम एच ४१ ए डी ४९७५ ही दुचाकी अब्दुल रहीम याने लबाडीने चोरून नेली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार बी. पी. गांगुर्डे करीत आहेत.

----------------------

टाकळीला महिलेचा विनयभंग

मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्या दिलीप लोटन शेवाळे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. शेवाळे यांनी घरात घुसून अंगलट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Kidnapped a minor girl