खोपडी येथे दहा ट्रॅक्टर चारा भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:29 IST2018-02-09T23:44:59+5:302018-02-10T00:29:55+5:30

सिन्नर : तालुक्यातील खोपडी शिवारात गुरुवारी सायंकाळी सुमारे १० ट्रॅक्टर चारा भस्मसात झाल्याची घटना घडली.

In the Khopdi, a ten-tracker fodder was consumed | खोपडी येथे दहा ट्रॅक्टर चारा भस्मसात

खोपडी येथे दहा ट्रॅक्टर चारा भस्मसात

सिन्नर : तालुक्यातील खोपडी शिवारात गुरुवारी सायंकाळी सुमारे १० ट्रॅक्टर चारा भस्मसात झाल्याची घटना घडली. खोपडी शिवारात विठ्ठल सखाहरी गुरूळे यांची वस्ती आहे. या वस्तीलगत जनावरांसाठी सुमारे १० ट्रॅक्टर चाºयाची वळई रचून ठेवली होती. दुपारी अचानक चाºयास भीषण आग लागली. वाळलेल्या चाºयाने क्षणार्धात पेट घेतल्याने गुरूळे कुटुंबीयांची धावपळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील शेतकरी धावून आले. तसेच सिन्नर परिषदेच्या बंबाला पाचारण करण्यात आले; मात्र वाळळेल्या चाºयाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत पूर्ण चारा जळून खाक झाला.

Web Title: In the Khopdi, a ten-tracker fodder was consumed

टॅग्स :fireआग