खो-खो प्रीमिअर लीगला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:15+5:302021-02-12T04:14:15+5:30

नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या प्रीमियर लीग खो-खो स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शुक्रवारपासून ...

Kho-Kho Premier League starts today | खो-खो प्रीमिअर लीगला आजपासून प्रारंभ

खो-खो प्रीमिअर लीगला आजपासून प्रारंभ

नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या प्रीमियर लीग खो-खो स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शुक्रवारपासून (दि. १२) प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा १४ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे.

खो-खो स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा कालावधीत उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे आवाहन नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर , आजीवन अध्यक्ष रमेश भोसले व सरचिटणीस उमेश आटवणे ,प्रसिद्धी प्रमुख सचिन निरंतर यांनी केले आहे. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात सामने खेळविले जातील. सकाळी आठ ते दहा व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत हे सामने खेळवण्यात येणार आहेत.

Web Title: Kho-Kho Premier League starts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.