खेडगावी साडेतीन लाखांची जबरी लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:02 IST2018-03-29T15:02:37+5:302018-03-29T15:02:37+5:30
वणी - खेडगाव येथील सेवानिवृत प्राचार्यांच्या घरावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारत सुमारे साडे तीन लाखांची धाडसी लुट केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडगावी साडेतीन लाखांची जबरी लुट
वणी - खेडगाव येथील सेवानिवृत प्राचार्यांच्या घरावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारत सुमारे साडे तीन लाखांची धाडसी लुट केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडगाव येथील सेवानिवृत प्राचार्य अशोक तुकाराम घोडेराव हे आंबेडकरनगर भागात वास्तव्यास आहेत. महत्वाच्या कामानिमित्त घराला कुलुप लावुन ते मुंबई येथे कामासाठी गेले होते. कामे आटोपून ते घरी परतले . कुलुप उघडुन दरवाजा उघडला मात्र तो आतुन बंद असल्याचे निदर्शनास आले. परिसरातील ग्रामस्थांना बोलावुन दरवाजा कसाबसा उघडला. आत प्रवेश करताच तिजोरीचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत दिसला तसेच कपड़े व वस्तु विखुरलेल्या स्थितीत आढळुन आल्या .. तिजोरीची तपासणी केली तेव्हा त्यातील सोन्याच्या पाच अंगठया एक लॉकेट, ३५ हजाराची रोकड असा सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरटयांनी लांबविले. घराच्या छतावरील सिमेंटचा पत्रा फोडुन अज्ञातानी कार्यभाग साधल्याचे दिसुन आले. वणी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. गेल्या काही कालावधीपासुन वाढलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमधे दहशत व घबराटीचे वातावरण आहे.