शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खेडगावला लवकरच पर्यटन केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:33 IST

येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. 

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची संकल्पना

खेडगाव : येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडित जमिनीत २०२२  साली मनरेगा व आताची नरेगा योजना व ग्रामनिधीअंतर्गत ग्रामपालिकेने एकूण २० हजार फळझाडांची लागवड केली होती. त्याला सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी नाशिकजिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी नरेगाची काम पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  बनसोड यांना प्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (दि. १३) बनसोड यांनी फळबाग लागवड प्रकल्पाला भेट दिली. वणी -पिंपळगाव रस्त्यालगत असलेला हा प्रकल्प बनसोड यांनी पूर्ण ३५ एकर पायी फिरून माहिती घेतली. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीकडे पडित जमीन असतील अशा पंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांचा पाहणी दौरा आयोजित करून त्यांना पूर्ण प्रकल्प कसा उभा राहिला याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. आता नवीन लागवड केलेल्या फणस, बोर, नारळ या फळझाडांनाही लवकरच फळधारणा सुरू होईल त्यातून परत ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.एरवी ग्रामपंचायतच्या जागेवर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक शेखर गोऱ्हे व सर्व सरपंच व सदस्य यांनी संकल्पना उदयास आली आणि आज ग्रामपंचायतला वार्षिक सध्या पाचलाख रुपये उत्पन्न सुरू झाले आहे.पाच वर्षांसाठी लिलावn सरपंच शीतल धुळे, ज्येष्ठ सदस्य अनिल ठुबे व ग्रामविकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकल्पाची उभारणीपासून तर आतापर्यंतची माहिती दिली. नरेगा व ग्रामनिधीच्या माध्यमातून येथे एकूण २० हजार फळझाडांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी आंबा, पेरू, चिकू या फळझाडांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून बहार येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच वर्षांसाठी एका खासगी व्यापाऱ्यास लागवड केलेल्या फळझाडे लिलाव पद्धतीनेसांभाळण्यास दिले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषदFarmerशेतकरी