खेडगावला ४५, तर गोवर्धन गटात ४३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:32 IST2019-12-12T23:24:50+5:302019-12-13T00:32:46+5:30
जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले.

खेडगावला ४५, तर गोवर्धन गटात ४३ टक्के मतदान
नाशिक : जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले.
शुक्रवारी (दि.१३) सकाळी १० वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या गोवर्धन गटाचे सदस्य हिरामण खोसकर आणि दिंडोरीतील खेडगाव गटातून धनराज महाले यांनी निवडणूक लढविल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे येथील जागा रिक्त असल्याने गुरुवारी या दोन्ही जागांसाठी मतदान घेण्यात आले. खेडगावला ४४.९९ टक्के, तर गोवर्धनला केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठा पणाला लागल्याने या दोन्ही ठिकाणी चांगली चुरस बघायला मिळेल असे वाटत असताना मतदारांमध्ये मात्र फारसा उत्साह दिसून आला नाही. सकाळपासून मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. दुपारनंतर काहीसा वेग वाढला आणि सायंकाळनंतर मतदार केंद्रांवर पोहोचले. या दोन्ही ठिकाणी अनेक केंद्रांवर सायंकाळी ५.३० वाजेनंतरही मतदानप्रक्रिया सुरू होती. गोवर्धन गटासाठी ३६ मतदान केंद्रांवर मतदान झाले़ गटासाठी ३७ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. २२२ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते.
या दोन्ही ठिकाणी होणाºया मतमोजणी केंद्रांसाठी एकूण ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोवर्धन गटाची मतमोजणी एकूण सहा टेबलांवर होणार आहे, तर खेडगाव गटाची मतमोजणीदेखील सहा टेबलांवर होणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल हाती येतील, असा अंदाज आहे.