मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी खाटमोडे
By Admin | Updated: May 14, 2015 00:17 IST2015-05-13T23:38:18+5:302015-05-14T00:17:15+5:30
मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी खाटमोडे

मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी खाटमोडे
नाशिक : भारतीय पोलीस सेवेतील सुमारे ८७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या झाल्या़ त्यामध्ये नाशिक शहर व जिल्'ातील सहा पोलीस अधिकारी इतरत्र बदलून गेले असून, चार नवीन पोलीस अधिकारी नाशिकला मिळाले आहेत़ त्यामध्ये दोन पोलीस उपायुक्तम्हणून, तर दोन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप दिवाण यांची चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी, तर पोलीस उपायुक्त (प्रशासन) निसार तांबोळी यांची औरंगाबादच्या एसआरपीएफ ग्रुपच्या कमांडंटपदी बदली झाली आहे़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील सह संचालक सुनील फुलारी यांची सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे़ याबरोबरच मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची चंद्रपूरच्या पोलीस अपर अधीक्षकपदी, पेठ विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मोक्षदा पाटील यांची जळगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांची मुंबईला पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे़ मुंबईचे पोलीस उपायुक्त व्ही़ बी़ देशमुख व हिंगोली येथील पोलीस अधीक्षक एन. अंबिका हे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्तपदी बदलून आले असून, मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी अकोला येथून निकेश खाटमोडे व पेठ उपविभागीय अधिकारीपदी अकोला येथूनच प्रवीण मुंढे बदलून आले आहेत़