खरवंडी गावकर्यांचा उपक्रम; तळ्यातील गाळ काढला
By Admin | Updated: June 1, 2014 00:47 IST2014-05-31T21:43:04+5:302014-06-01T00:47:01+5:30
येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली.

खरवंडी गावकर्यांचा उपक्रम; तळ्यातील गाळ काढला
येवला : खरवंडी या गावात तळ्यातील गाळ काढण्याचे काम करून तळ्याची साठवण क्षमता वाढली व गाळाचा उपयोग होऊन ६ एकर क्षेत्रदेखील सुपीक झाले. हा उपक्रम राबवून खर्या अहल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली.
गेल्या तीन महिन्यापासून खरवंडी येथील मच्छिंद्र थोरात, विनायक थोरात, गोरख थोरात यांनी येथील तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू केले व तळ्याचा गाळ काढल्याने साठवण क्षमता वाढली. असेच प्रयोग देवदरी व अंगुलगाव या गावातही करण्यात आले. यापूर्वी या गावांमध्ये फेब्रुवारीतच टँकरने पाणी पुरवावे लागत होते. पण या प्रयोगामुळे मेअखेरही फारशी पाणीटंचाई या गावांना भासत नसल्याने जिल्हा पंचायत सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
अहल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त खरवंडी येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहल्याबाईंना तत्कालीन परिस्थितीत पाण्याचे नियोजन किती सुरेख पद्धतीने केले होते. तो आदर्श घेण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे. सरपंच तुकाराम घायवट, भागीनाथ मोरे यांच्यासह शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
इन्फो
गावतळ्याचे गाळ काढण्याचे उपक्रम प्रत्येक गावाने हाती घ्यावे, तळ्याची पाणी साठवण क्षमताही वाढते. सुपीक गाळ जमिनीत टाकला तर जमीनही सुपीक होते. असा दुहेरी फायदा कित्येक वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला सांगितला. त्याचा कित्ता गिरविण्याची गरज आहे. टँकरमुक्त गांव करण्यासाठी ही योजना फलदायी आहे.
- शेतकरी, खरवंडी