खरीप हंगामातील पिके सोंगणीस सुरु वात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:36 IST2020-10-10T23:53:45+5:302020-10-11T00:36:00+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची खरीप हंगामातील पिके सोंगणीची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध करण्यासाठी सध्या शेतकरी व्यस्त झाला आहे.

खरीप हंगामातील पिके सोंगणीस सुरु वात
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाची खरीप हंगामातील पिके सोंगणीची लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी मजूर वर्ग उपलब्ध करण्यासाठी सध्या शेतकरी व्यस्त झाला आहे.
रब्बी हंगामात शेतकरी वर्गाला कुठल्याही शेती मालाला भाव भेटला नाही. भरपूर भांडवल खर्च करून ही उत्पन्नाची आवक पदरात काहीही न पडल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. त्यात कोरोनाच्या साथीत द्राक्षबाग सापडल्याने चांगला द्राक्षमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. या हंगामात बळीराजांचे पूर्ण कष्ट मातीमोल गेले. परंतु रब्बी हंगामात आलेला कटु अनुभव बाजुला सावरून बळीराजाने नव्या जोमाने खरीप हंगामासाठी जोरदार तयारी करून मका, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मुग, इ.पिकांना पसंती देत खरीप हंगामात दिंडोरी तालुक्यात 98 टक्के खरीप हंगामाचे उद्दिष्टे पूर्ण केले. अगोदर पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगामातील पिके चांगल्या स्थितीत होते. परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय असा सवाल निर्माण झाला होता. परंतु परत पावसाने आपला लहरीपणा दाखवत दिंडोरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली व दुबार पेरणीचे संकट टळले.
सर्व पिके जोमात असताना परत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, मुग व काही नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने जवळ जवळ सर्वच पिकांची वाट लागली. शेतकरी वर्गाला खरीप हंगाम चांगला जाईल व रब्बी हंगामातील नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा होती. परंतु परतीच्या पावसाने ही आशा फोल ठरविली.