पावसा अभावी खरीप पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:49 IST2018-10-05T16:49:09+5:302018-10-05T16:49:33+5:30

 Kharif crops in danger of wanting rain | पावसा अभावी खरीप पिके धोक्यात

पावसा अभावी खरीप पिके धोक्यात

ठळक मुद्दे ओतूर: कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात एक महिन्या पासुन पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्तर नक्षत्रा पाठोपाठ हत्ती नक्षत्र ही कोरडे जात आहे त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, भात, कडधान्ये वाळली


ओतूर:
कळवण तालुक्यातील ओतुर परिसरात एक महिन्या पासुन पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्तर नक्षत्रा पाठोपाठ हत्ती नक्षत्र ही कोरडे जात आहे त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, भात, कडधान्ये वाळली आहेत. ओतूर धरणाचे पाणी कमी झाले आहे व आरजल पाझर तलाव आटला आहे त्यामुळे मार्कंडेय नदीत कमी पाणी वहात आहे. विहीरीवरु न पाणी भरून आपली पिके वाचवण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत. जर येत्या चार दिवसात पाऊस आला नाही तर परिसरातील खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
 

Web Title:  Kharif crops in danger of wanting rain