खर्डेला वामनानंद महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:20 IST2020-12-25T17:20:34+5:302020-12-25T17:20:46+5:30

संपूर्ण गावातून सजवलेल्या राथाद्वारे बाबांच्या मूर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक

Khardela Vamanananda Maharaj idol's prestige | खर्डेला वामनानंद महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

खर्डेला वामनानंद महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

ठळक मुद्दे बाबांचा भक्त परिवार याठिकाणी गुरुपौर्णिमा तसेच दत्त जयंतीनिमित्त येत असतो.

 


खर्डे : येथील गुरुदेव दत्त मंदिरात वैकुंठवासी वामनानंद महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.देवळा तालुक्यातील खर्डे येथे वैकुंठवासी वामनानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री गुरुदेव दत्त मंदिराची उभारणी करण्यात आली आहे . या मंदिरात शुक्रवारी (दि.२५) त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी संपूर्ण गावातून सजवलेल्या राथाद्वारे बाबांच्या मूर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी औक्षण करून दर्शन घेतले. देवळा तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात बाबांचा भक्त परिवार याठिकाणी गुरुपौर्णिमा तसेच दत्त जयंतीनिमित्त येत असतो. यावर्षी दत्त जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींचे पालन करून साजरी करण्यात येणार असल्याची माहिती ह भ प पुंडलिक महाराज यांनी दिली. दत्त जयंती निमित्त मंदिरात रोज प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .
 

 

Web Title: Khardela Vamanananda Maharaj idol's prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक