खान्देश मराठा मंडळाकडून विद्यार्थ्यांचा गुण गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:59 IST2020-09-15T23:12:12+5:302020-09-16T00:59:38+5:30

सातपूर :- सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील खान्देश मराठा मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाला. सातपूर येथील मंडळाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिमा हिरे उपस्थित होत्या.

Khandesh Maratha Mandal honors students | खान्देश मराठा मंडळाकडून विद्यार्थ्यांचा गुण गौरव

खान्देश मराठा मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या प्रसंगी आमदार सीमा हिरे,प्राचार्य प्रशांत पाटील,शंकर पाटील,सुधाकर शिसोदे,दिलीप नेरे,संदीप पाटील,देवराम सैंदाणे, रवींद्र पाटील,हेमंत शिरसाठ, अभिमन्यू साळुंखे आदी.

ठळक मुद्देगुणगौरव सोहळा कोविडमुळे साधेपणाने साजरा

सातपूर :- सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील खान्देश मराठा मंडळाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाला.
सातपूर येथील मंडळाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सिमा हिरे उपस्थित होत्या.दरवर्षी भरगच्च आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने सहकुटुंब होणार गुणगौरव सोहळा कोविडमुळे साधेपणाने साजरा करावा लागत असल्याची खंत मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील,महेश हिरे,बाजीराव चव्हाण,उपाध्यक्ष सुधाकर शिसोदे,रवींद्र पाटील,हेमंत शिरसाट,बी.आर.पाटील,संदीप पाटील, देवराम पाटील,शिवाजी शिसोदे,दीपक देसले, मनोज आमले,सुभाष चव्हाण,दिलीप नेरे,अभिमन्यू साळुंखे, नितीन पाटील आदी उपस्थित होते.यावेळी समाजातील प्रातिनिधिक दहा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. अन्य सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र घरपोहोच दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.प्रास्तविक व स्वागत प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सेक्रेटरी अविनाश पाटील यांनी केले.शंकर पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी,सदस्य व सत्कारार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
 

 

Web Title: Khandesh Maratha Mandal honors students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.