खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:04 IST2019-02-14T18:03:16+5:302019-02-14T18:04:30+5:30
जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास भव्य काठी मिरवणुकीने सुरवात झाली असुन पालखीबरोबर अश्व मिरवणुकीत सर्व गाव खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये न्हावून निघाले होते. सात दिवस विविध नामवंत वाघ्या मुरळी पाटीसह जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून मंगळवारी (दि.१९) बारा गाड्या ओढण्याचा होणार आहे.

जळगाव नेऊर येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त काढलेल्या काठी मिरवणुकीत सहभागी ग्रामस्थ व भाविक.
जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास भव्य काठी मिरवणुकीने सुरवात झाली असुन पालखीबरोबर अश्व मिरवणुकीत सर्व गाव खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये न्हावून निघाले होते. सात दिवस विविध नामवंत वाघ्या मुरळी पाटीसह जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करण्यात आला असून मंगळवारी (दि.१९) बारा गाड्या ओढण्याचा होणार आहे. यंदाचा मान सुकदेव घुले यांना मिळाला आहे. सप्ताह काळात नारायण अस्वले (नाशिक), मंदा सोनवणे (कोपरगाव), अनिल पोकळे (मानोरी), बाळु भुसे व शाहीर विजय भोळे (नाशिक), नाना शेळके (लासलगाव), एकनाथ बाहुले (चिखलठाणा) आदी कलाकारांचा जागरण गोंधळाचा कार्यक्र म दररोज रात्री खंडेराव मंदिरासमोर होणार आहे.
खंडेराव महाराज यात्रोत्सवास यशस्वीतेसाठी प्रभाकर शिंदे, आप्पासाहेब शिंदे, अशोक शिंदे, गणपत गुंड, विजुबाबा, सर्जेराव शिंदे, शालीग्राम महाले, बाळासाहेब चव्हाणके, शांताराम शिंदे, नानासाहेब शिंदे, अशोक वाघ, विलास कुराडे, बाबासाहेब गुळे, नवनाथ शिंदे, वाळूबा सोनवणे, प्रभाकर तांबे, बबन शिंदे, साहेबराव घुले आदी प्रयत्नशील आहेत.