खालपच्या लष्करी जवानाचे जम्मू काश्मीर येथे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:59 IST2018-09-13T00:58:32+5:302018-09-13T00:59:06+5:30
देवळा : तालुक्यातील खालप येथील सैन्य दलातील जवान विजय काशीनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर असताना मंगळवारी (दि. ११) रात्री आकस्मित निधन झाले.

खालपच्या लष्करी जवानाचे जम्मू काश्मीर येथे निधन
देवळा : तालुक्यातील खालप येथील सैन्य दलातील जवान विजय काशीनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर असताना मंगळवारी (दि. ११) रात्री आकस्मित निधन झाले.
जम्मू काश्मीर येथे निकम यांचे बुधवारी (दि. १२) शवविच्छेदन करण्यात आले असून, गुरुवारी (दि.१३) सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहे.
निकम यांच्या निधनाचे वृत्त कळताच खालप परिसरावर शोककळा पसरली. निकम यांच्यावर शुक्र्रवारी (दि. १४) रोजी त्यांचे पार्थिव खालप येथे त्यांच्या गावी आणल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना, मुलगा ओमकार, सत्यम असा परिवार आहे. विजय निकम यांचे वडील काशीनाथ निकम २००५ मध्ये, तर आईचे २००६ मध्ये निधन झाले. विजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खालप येथे झाले. २२ फेब्रुवारी २००३ रोजी विजय भारतीय सैन्य दलात दाखल झाले. ५७ वायरलेस रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. बुधवारी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत दुखवटा पाळला.