शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

केशकर्तनचा व्यवसाय झाला हायटेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:54 AM

केशकर्तन! दहा बोटांची कला पण व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालणारी! बारा बलुतेदारीतील या व्यवसायाने आता कात टाकली असून, हा व्यवसाय आता नव्या पद्धतीने बदलू लागला आहे. विशेषत: नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कार्पोरेट कंपन्या उतरल्या

नाशिक : केशकर्तन! दहा बोटांची कला पण व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालणारी! बारा बलुतेदारीतील या व्यवसायाने आता कात टाकली असून, हा व्यवसाय आता नव्या पद्धतीने बदलू लागला आहे. विशेषत: नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कार्पोरेट कंपन्या उतरल्या असून, त्यांना या व्यवसायाचे महत्त्व उमगल्याने पारंपरिक नाभिक समाजाचे केशकर्तन व्यावसायिकदेखील आता बदलू लागले आहेत.केशकर्तन म्हणजेच केस कापण्याबरोबरच दाढी करणे यापलीकडे आता व्यवसाय कधीच गेला असून, मुलांमुलींतील वाढत्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे हा व्यवसाय अधिकच व्यापक होत चालला आहे. केशकर्तनाचा हा व्यवसाय पारंपरिक आणि पिढीजात चालत आलेला आहे. घरातून केशकर्तनाचे धडे मिळत असले तरी समाज व्यवस्थेत समाजाला खूप महत्त्व होते. ग्रामीण भागात आसामी म्हटले जात म्हणजेच दाढी आणि केशकर्तनाच्या बदल्यात वर्षभराचे धान्य दिले जात. जावळ काढणे, मौंजी इतकेच नव्हे तर गंधमुक्तीलादेखील नाभिक समाजाकडेच मान होता. आता काळ बदलला. समाज या व्यवसायात स्थिरावला. परंतु केशकर्तन हा ‘व्यवसाय’ झाला आणि व्यवसाय म्हंटला की, तो कोणीही करू शकतो याच धर्तीवर सेलीब्रिटींच्या केशकर्तनालय आणि ग्रुमिंगची दुकाने थाटली जाऊ लागली. नाशिकमध्येदेखील आठ ते दहा सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी आणि केशकर्तनाच्या कार्पोेरेट कंपन्यांनी फ्रेंचाइजी दिल्या आहेत. काम केशकर्तनाचेच, परंतु अत्यंत सुबक आणि व्यावसायिक पद्धतीने होऊ लागले. पारंपरिक व्यवसायाला असा ग्लोबल टच आणि कार्पोरेट लुक आल्यानंतर नाभिक समाजाच्या नव्या पिढीलादेखील त्याचे मोल कळले.व्यवसाय म्हणून अशा कंपन्यांकडून आकारले जाणारे दर आणि केली जाणारी सेवा यामुळे या नव्या पिढीला धडा मिळाला. नाभिक समाजेतर अनेक लोक या व्यवसायात उतरले असून, ते कार्पोरेट नाही तर पारंपरिक पद्धतीचे सलुन्स चालवित आहेत.परंतु सलून म्हणजे नेहमीच्या कामांपेक्षा मुला-मुलींचे वेगवेगळे हेअर कट, फेशियल, मसाज, हेड मसाज, फुल बॉडी मसाज, हेअर डाय, ब्लिचिंग इतकेच नव्हे तर नखेदेखील वेगळ्या पद्धतीने कापून त्याचेदेखील सौंदर्य वाढविणे, चेहऱ्यावरील व्रण किंवा मोस काढणे यासाठी वेगळी थेरपी अशाप्रकारची सर्वच कामे होऊ लागली आहेत. मोठ्या प्रशिक्षित व्यवसायांच्या स्पामध्ये ज्या सेवा दिल्या जातील त्या सर्व आता पारंपरिक व्यावसायिकदेखील देऊ लागले आहेत. त्यासाठी सलुन्सचे अंतरंगदेखील बदलू लागले आहे. इंटेरियरचा वापर करून शहरातील विविध भागांमध्ये तसेच उपनगरांमध्येदेखील आकर्षक पद्धतीने सलुन्स सजू लागली आहेत.दुकानांचेही बदलले स्वरूपकोणत्याही व्यवसायासाठी तेथील आकर्षक वातावरण आणि सेवा सुविधा महत्त्वाच्या ठरतात. पारंपरिक सलुन्स व्यावसायिकांनी दुकानांचा लूक बदलला आहे. चांगले दुकान करण्यासाठी किमान आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च सहज येतो. रंगसंगती, आरामदायी खुर्च्या, सौम्य संगीत, वायफाय, चहा-कॉफीची सोय अशा सर्वच प्रकारच्या सेवा सुविधा देण्यावर आता व्यावसायिकांचा भर असून, त्यामुळे ग्राहक आकर्षित होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक