नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी केळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:27 IST2019-09-24T01:27:04+5:302019-09-24T01:27:23+5:30

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या तीन पदांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

 Kelkar chairs Nashik Education Broadcasting Board | नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी केळकर

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी केळकर

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या पुढील पाच वर्षांसाठीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या तीन पदांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. भरत केळकर, उपाध्यक्षपदी संजय लोंढे व डॉ. सुनील कुटे यांची बिनविरोध निवड झाली.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २२) जु. स. रुंगटा हायस्कूलच्या सभागृहात मावळते अध्यक्ष डॉ. वि. रा. काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, डॉ. सुनील कुटे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, टीएम बोर्ड अध्यक्ष भैया चव्हाण उपस्थित होते. सभेला सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते. प्रारंभी सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी इतिवृत्त सादर केले. त्यानंतर सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

Web Title:  Kelkar chairs Nashik Education Broadcasting Board