ओझरच्या जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी केकाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:54 IST2021-02-02T17:52:53+5:302021-02-02T17:54:29+5:30
ओझर टाऊनशिप : येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव केकाण यांची तर उपाध्यक्षपदी पार्वताबाई शिंदे व सचिवपदी भास्करराव तासकर यांची निवड करण्यात आली.

ओझरच्या जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अध्यक्षपदी केकाण
ओझर टाऊनशिप : येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव केकाण यांची तर उपाध्यक्षपदी पार्वताबाई शिंदे व सचिवपदी भास्करराव तासकर यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे प्रभारी अध्यक्ष वामनराव धारराव यांच्या अध्यक्षतेखाली सभेत संस्थेच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाची नावे सल्लागार मुरलीधर महाडिक यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. संस्था नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये सचिव भास्करराव तासकर, कोषाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, कार्यकारिणी सदस्य म्हणून वामनराव धारराव, कुमुदिनी महाडिक, पंडित मौले, एकनाथ गाडेकर, दिनेश ताडे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन भास्करराव तासकर यांनी केले तर कुमुदिनी महाडिक यांनी आभार मानले. (०२ शिवाजीराव केकाण)