शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे.

By admin | Updated: January 18, 2015 01:55 IST

देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे.

नाशिक : आपण ज्या देशात व ज्या शहरात राहतो त्या देशाच्या आणि शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील रहावे. तसेच सदैव प्रामाणिकपणे देशभक्ती जोपासण्याची शिकवण प्रेषित पैगंबरांनी दिली आहे. त्यांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत या शांतताप्रिय धर्मनिरपेक्ष भारताच्या विकासासाठी दाऊदी बोहरा मुस्लीम समाजाने योगदान देऊन राष्ट्राला बळकट करावे, असे आवाहन समाजाचे ५३वे धर्मगुरू सय्यदना आलीकद्र मुफद्दल सैफुद्दीन यांनी शहरात केले.टाकळीरोड परिसरातील बद्री वसतिगृहाच्या आवारात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सय्यदना सैफुद्दीन प्रमुख अतिथी म्हणून उपदेश करत होते. यावेळी सय्यदना म्हणाले, मानवाने पृथ्वीतलावर उत्कृष्ट पद्धतीची आदर्श जीवनशैलीचा अवलंब करावा, म्हणून अल्लाहने प्रेषित पैगंबरांना (रसूल) पाठविले. इस्लाम धर्म व या धर्माच्या प्रेषितांनी नेहमीच शांतता, मानवता व सदाचाराची शिकवण जगाला दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहून देशात किंबहुना पृथ्वीवर शांतता व एकता टिकवून ठेवण्यामध्ये योगदान द्यावे. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, योगेश घोलप, महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक अर्चना थोरात, सचिन मराठे आदि मान्यवर उपस्थित होते. टाकळीफाटा येथील बोहरा समाजाच्या कुतुबी मशिदीचे मुख्य इमाम अमील अदनान भाई यांनी सय्यदना यांचे स्वागत करत मोठ्या आदराने त्यांना व्यासपीठावर आणले. व्यासपीठाच्या रस्त्याच्या दुतर्फा महिला व पुरुष समाजबांधव मोठ्या संख्येने सय्यदना यांना अभिवादन करत होते व सय्यदना यांनीदेखील समाजबांधवांच्या दिशेने हात उंचावून हळुवारपणे मार्गस्थ होत आशीर्वाद दिले. मुर्तडक व फरांदे यांनी नाशिककरांच्या वतीने सय्यदना यांचे शहरात स्वागत केले. (प्रतिनिधी)