शहरं
Join us  
Trending Stories
1
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
3
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
4
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
5
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
6
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
7
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
8
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
9
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
10
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
11
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
12
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
13
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
14
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
15
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
16
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
17
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
18
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
19
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
20
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासासाठी विवेकबुध्दी जागृत ठेवावी : तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:58 IST

नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामुहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसीत होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले.

ठळक मुद्दे'स्मार्ट शहर' नावापुरते असून चालणार नाहीकरवाढ नियमबाह्य मुळीच नाही

नाशिक : शहरामधील जीवनमान उंचविण्यासाठी स्वयंरोजगारनिर्मितीसह मुलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराकडे वाटचाल करताना मुलभूत सोयीसुविधा पुरविणे महापालिकेची जबाबदारी आहे. कारण 'स्मार्ट शहर' केवळ नावापुरते असून चालणार नाही. त्यासाठी शाश्वत विकास गरजेचा आहे, त्यामुळे शहराचे नागरिक या नात्याने शाश्वत विकास संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी विवेकबुध्दी जागृत ठेवावी, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ५४ वे पुष्प मुलभूत हक्क आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी (दि.२०) परशुराम सायखेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंढे यांनी 'महानगर प्रशासन-शासन व नागरिक' याविषयावर व्याख्यानातून प्रशासनाची व नागरिकांची कर्तव्ये-अधिकार, नगरनियोजन धोरण-अंमलबजावणी या बाबींचा आढावा घेतला. यावेळी मुंढे म्हणाले, नाशिककरांना आज पाणी मिळत असले तरी ते पुरेसे आणि गुणवत्तापुर्ण नाही. नाशिकमध्ये भविष्यात २४ तास पाणीपुरवठा नळांमधून व्हावा, हा प्रयत्न राहणार आहे. नवीन वसाहती ज्या उदयास येत आहे तेथे पिण्याच्या पाण्याच्या उप जलवाहिन्या टाकणे तसेच जलवाहिन्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. यासाठी ५० कोटींची गरज आहे; मात्र त्यासाठी कोणीही प्रश्न उपस्थित करीत नाही, असेही मुंढे म्हणाले. भुमिगत ड्रेनेजची व्यवस्था सुधारायची असेल तर त्यासाठी कर लावावा लागेल, कारण त्या सुविधेचा दर्जा सुधारण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. तो खर्च कर स्वरुपात भागवावा लागणार आहे. तरच गोदावरी शुध्द होईल आणि सांडपाण्याची विल्हेवाट लागेल....म्हणून नाशिककर भाग्यवानसोलापूरला पिण्याचे पाणी दुषित स्वरुपाचे असल्याचे सिध्द झाले आहे. नाशिककर भाग्यवान आहे की, गंगापूर, मुकणे धरणाच्या वरच्या बाजूस मोठी शहरे नाही. नैसर्गिक स्त्रोत हे वैयक्तिक मालकीचे नसून सामुहिक मालकीचे आहे, त्यावर सर्वांचा अधिकार आहे, असा दृष्टिकोन जोपर्यंत विकसीत होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकासाची संकल्पना अंमलात येऊ शकत नाही, असे मुंढे म्हणाले.'नाशिक माझं घर'हे शहर म्हणजे माझे घर आहे. घर चांगले रहावे ही माझी जबाबदारी आहे. घर चालविताना मला कर्तव्याची जाणीव करुन द्यावीच लागणार आहे. या शहरात सर्व मुलभूत सोयीसुविधा नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मिळाव्या यासाठी मला कर आकारावे लागेल, पण करवाढ नियमबाह्य मुळीच राहणार नाही, याचा विश्वास बाळगावा, असे मुंढे म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर