कविता राऊत होणार अधिकारी
By Admin | Updated: March 28, 2017 01:47 IST2017-03-28T01:46:51+5:302017-03-28T01:47:07+5:30
नाशिक : देशाची व नाशिकची मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे.

कविता राऊत होणार अधिकारी
नाशिक : देशाची व नाशिकची मानबिंदू कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात येत्या काही दिवसांतच वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळणार आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी त्याचे जाहीर सुतोवाच सोमवारी (दि.२७) नाशिकला केले.
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्याची मागणी सोमवारी नाशिकला झालेल्या आदिवासी विकास सेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. त्याला उत्तर देताना आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी ही घोषणा केली. कविता राऊत हिने नाशिक आणि महाराष्ट्राचीच शान नव्हे तर भारताचा मान वाढविला आहे. सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणाऱ्या कविता राऊत हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके घेतानाच आॅल्मिपिकमध्येही सहभाग घेतला आहे. त्यामुळे कविता राऊत हिला आदिवासी विकास विभागात वर्ग एक अधिकारी करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाने तयार केला असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चाही झाली आहे. प्रधान सचिव व मुख्यमंत्र्यांच्या मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच कविताला सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)