कथक नृत्याविष्काराने रसिक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:12 IST2018-11-14T23:40:11+5:302018-11-15T00:12:08+5:30
पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.

कथक नृत्याविष्काराने रसिक दंग
नाशिक : पहिल्या दिवशी अहिरभैरव रागातील तराणा कथक नृत्याविष्कारानंतर आवर्तन संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ नृत्याविष्काराच्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त परशुराम साईखेडक र नाट्यगृहात मंगळवारी (दि.१३) कृतज्ञता सोहळ्यात ‘विशारद पूर्ण’ पदवी प्राप्त करणाºया निहारिका देशपांडे, गंधाली खेडलेकर आणि सावनी बंकापुरे यांच्यासह संस्थेच्या प्रवासात योगदान देणाºया व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी ‘जय जयती गजवदन’ या गणेशवंदनेने सोहळ्याची सुरुवात झाली. दुसºया सत्रात कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी ‘दश-धा’ ही नृत्यप्रस्तुती सादर करताना ‘दश-धा’ या दहा मात्रांचा झपताल सादर केला. त्यानंतर तालअंगात थाट, उठान, आमद, परणजुडी आमद, तोडे, परण, चक्र दार परण, ततकार हा कथकचा पारंपरिक वस्तुम सादर करून रसिकांची मने जिंकली. तबल्यावर कल्याण पांडे व वैष्णवी भडकमकर यांच्यासह हार्मोनियम व गायन पुष्कराज भागवत आणि सिंथेसायझरसह अनिल धुमाळ यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.
त्रिपल्ली, गिनतीची तिहाई नृत्याविष्काराचा आस्वाद घेताना रसिक दंग झाले. सवाल-जवाब या प्रकारालाही रसिकांची विशेष दाद मिळाली. कथकची विशेषता असलेला गतनिकास विद्यार्थिनींनी नजाकतीने प्रस्तुत केला. त्यानंतर अभिनय पक्षात ‘दशावतार’ सादरीकरणाने आवर्तन संगीत सोहळ्याचा समारोप झाला.