कातरवाडी गावाची विकासाकडे वाटचाल

By Admin | Updated: February 3, 2016 22:03 IST2016-02-03T22:00:37+5:302016-02-03T22:03:17+5:30

दरेगाव : ग्रामसभेत सादर केला पाण्याचा ताळेबंद

Katarwadi walk towards the development of the village | कातरवाडी गावाची विकासाकडे वाटचाल

कातरवाडी गावाची विकासाकडे वाटचाल

 दरेगाव : कातरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागने ग्रामसभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
गावाचा आभासी विकास करण्यापेक्षा आजच्या परिस्थितीचे अवलोकन करुन शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामसभेत गाव विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली. कातरवाडी गावाचे
तीन महिन्यापासून पाटील एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणाच्या माध्यमातून सर्व खासगी, सरकारी क्षेत्र विविध एजन्सीमार्फत झालेले बंधारे, पाझर तलाव, नाले, पाणी साठवणुकीचे सर्व बाबीचे अवलोकन करण्यात आले. त्यावरुन त्यांची आजची स्थिती समजली. सर्वेक्षणातून सर्व तांत्रिक बाजू समजल्याने भविष्यातील कामाचे यंोग्य नियोजन करण्यास मदत होईल. कातरवाडी ग्रामसभेत गावचे मूळ रहिवासी व कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे
यांनंी पाण्याचा ताळेबंद मांडला. कातरवाडी गावाची वर्षाची पाण्याची गरज पिण्याची व पिकासाठी ही १९८२.४७ टी.सी.एम. आहे.
पावसाचे सरासरी वर्षाकाठी ५८६. ५३ टीसीएम पाणी मिळते. मात्र त्यापैकी मात्र २६०.९६ टी.सी.एम. एवढेच पाणी अडविले जाते. उर्वरित १७२१.५१ टीसीएम पाणी अडविण्यासाठी विविध य्
ोजनांच्या माध्यमातून, खासगी संस्थांच्या मदतीने कामे पूर्ण करण्याचे सभेत ठरविण्यात आल्याचे झाल्टे यांनी सांगितले.
ग्रामसेवक यांनी नवीन कर आकारणी, वनहक्क दावे, पिण्याचे पाण्याची टंचाई, अन्नसुरक्षा यादी, जलसुरक्षा अभियानअंतर्गत
कामे, स्वच्छ भारत मिशन, मग्रा रोहयोअंतर्गत सुरु करावयाची
कामे आदिबाबत माहिती
दिली.
ग्रामसेवक यांनी नाशिक जिल्ह्यातून कातरवाडी गावाची केंद्र शासनाची पाणीपुरवठा योजना मंत्रालयाकडून जल क्रांती अभियानासाठी निवड केल्याचे सांगितले. पुढील पाच वर्षांत
त्यांच्या माध्यमातून मोठी कामे होण्याची अपेक्षा सरपंच गीता
झाल्टे यांनी व्यक्त केली. ग्रामसभेस सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
( वार्ताहर)

Web Title: Katarwadi walk towards the development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.