कातरणीत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाला कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST2021-09-26T04:17:06+5:302021-09-26T04:17:06+5:30
शनिवारी (दि. २५) कातरणी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. सभेत सदस्य व सरपंचांनी ग्रामसेवक संजय व्यवहारे यांच्यावर भ्रष्टाचार, कामात अनियमितता ...

कातरणीत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाला कोंडले
शनिवारी (दि. २५) कातरणी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. सभेत सदस्य व सरपंचांनी ग्रामसेवक संजय व्यवहारे यांच्यावर भ्रष्टाचार, कामात अनियमितता तसेच ग्रामपंचायत निवडणुका होऊन साडेपाच महिन्यांत एकही विकास काम सुरू न केल्याचा ठपका ठेवला. तर सभा संपल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक व्यवहारे यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून घेतले. ही घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. ग्रामपंचायत दप्तर घरी घेऊन न जाता कार्यालयातच काम पूर्ण करण्याच्या अटीवर कुलूप काढण्यात आले. उपसरपंच योगेश पाटील यांनी, घरपट्टी पाणीपट्टी तसेच बाजार लिलाव हिशेब यात तफावत आढळून आली. यामुळे सदस्यांनी ग्रामसेवक व्यवहारे यांना कार्यालयात कुलूप लावून कोंडून ठेवल्याचे सांगितले. यावेळी सरपंच रेखा कदम, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. (२५ कातरणी १/२)
250921\25nsk_49_25092021_13.jpg~250921\25nsk_50_25092021_13.jpg
२५ कातरणी १~२५ कातरणी २