दिंडोरीत काश्मीरप्रश्नी जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:40 IST2019-08-06T17:40:18+5:302019-08-06T17:40:42+5:30
दिंडोरी : काश्मीरप्रश्नी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवून केंद्र शासनाने अखंड भारताचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल पालखेड चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला.

दिंडोरीत काश्मीरप्रश्नी जल्लोष
दिंडोरी : काश्मीरप्रश्नी कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवून केंद्र शासनाने अखंड भारताचे स्वप्न पुर्ण केल्याबद्दल पालखेड चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडत, मिठाई वाटण्यात आली.
केंद्र शासनाने जम्मू आणि काश्मीरला केंद्र शासित प्रदेश घोषित करत लडाखला देखील वेगळे केले, भाजपा सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ दिंडोरीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, रणजित देशमुख, नगरसेवक निलेश गायकवाड, संपतराव पिंगळ, संतोष मुरकुटे, दत्ता जाधव, तुषार घोरपडे, गणेश देशमुख, भास्कर कराटे, विक्र म राजे, सुनिल चौगुले, भिकन मुरकुटे, धीरज चव्हाण, महेश घाडगे, आदींसह नागरिक उपस्थित होते.