कासारवाडी घरफोडीत ५० हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 15:23 IST2018-12-05T15:22:51+5:302018-12-05T15:23:04+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी व चास येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्याने खळबळ उडली आहे.

Kasarwadi house robbery 50 thousand stolen | कासारवाडी घरफोडीत ५० हजारांची चोरी

कासारवाडी घरफोडीत ५० हजारांची चोरी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी व चास येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्याने खळबळ उडली आहे. कासारवाडी येथील मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले गोरक्षनाथ दशरथ शेळके यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ५० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. शेळके हे मुंबई पोलीस दलात असल्याने सुट्टीच्या वेळी गावी येत असतात. शेळके यांच्या मुलाचे लग्न असल्याने फोटोग्राफर व दुकानदारांना देण्यासाठी ५० हजार रूपये घरात आणून ठेवले होते. ते बाहेरगावी असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत ५० हजार रूपयांवर डल्ला मारला. घरातील सर्व सामानाची तसेच कपाटातील वस्तूंची उचकापाचक चोरट्यांनी केली. शेळके यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत चोरी केली. तसेच चास-कासारवाडी रस्त्यालगत चास येथील आनंद मोहन शिरसाठ व चंदन गंगागिर गोसावी यांच्या घरात देखील घरफोडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांच्या बाहेरून कडीकोयंडा लावण्यात आला होता. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घरांना लक्ष केले. चास व कासारवाडी या दोन्ही ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याची चर्चा आहे. याबाबत नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात गोरक्ष शेळके यांनी चोरी झाल्याची तक्रार दिली आहे.

Web Title: Kasarwadi house robbery 50 thousand stolen

टॅग्स :Nashikनाशिक