शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

करमाळकर यांनी स्वीकारला  आरोग्य विद्यापीठाचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:10 AM

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना गुरुवारी (दि. ११) निरोप देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड करमाळकर यांच्याकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देदिलीप म्हैसेकर यांना निरोप : नूतन कुलगुरु निवडीची प्रतीक्षा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना गुरुवारी (दि. ११) निरोप देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड करमाळकर यांच्याकडे सुपूर्द केला.डॉ. नितीन करमाळकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असून, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात बी.एस्सी. केल्यानंतर त्यांनी एम.एस्सी.साठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे ‘पेट्रोग्राफी जिओकेमिस्ट्री ऑफ अल्ट्रामफाइट्स फ्रॉम पार्टस ऑफ लडाख हिमालया (विथ रेफ्रन्स टू क्रोमॅटिक मिनरलायझेशन)’ विषयात पीएच.डी. प्राप्त केली. याच विषयाशी निगडित बाबींवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीत तसेच जर्मनीत संशोधन केले आहे. डॉ. नितीन करमाळकर यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव असून पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्याचे संशोधनाचे विषय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. परदेशातील काही संस्थांबरोबर सध्या संशोधन प्रकल्प सुरू आहेत. पाषाण हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध प्रकारच्या अधिवासात आढळणाऱ्या पाषाणांवर त्यांचे संशोधन सुरू आहे.याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी उपस्थित होते.कार्यप्रणालीचे सादरीकरणडॉ. म्हैसेकर व प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या पदाचा कार्यकाळ गुरुवारी (दि. ११) संपुष्टात आला. त्यांना निरोप देतानाच विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज व कार्यप्रणालीबद्दल सादरीकरणाद्वारे करमाळकर यांनी थोडक्यात माहिती दिली.  

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ