कारगिल विजयदिनी नेऊरगावी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:39+5:302021-07-30T04:14:39+5:30

२६ जुलै हा दिवस कारगिल विजय‌ दिवस म्हणुन साजरा केला जातो. कारगील युद्धात प्राणांची‌ आहुती देत देशरक्षणासाठी शहीद ...

Kargil Victory Day Neuragavi Tree Plantation | कारगिल विजयदिनी नेऊरगावी वृक्षारोपण

कारगिल विजयदिनी नेऊरगावी वृक्षारोपण

२६ जुलै हा दिवस कारगिल विजय‌ दिवस म्हणुन साजरा केला जातो. कारगील युद्धात प्राणांची‌ आहुती देत देशरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून नेहरू युवा केंद्र नाशिक- येवला विभागाच्या वतीने नेऊरगाव येथे सैन्य दलात आपली सेवा बजावत असलेले योगेश बोराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या वीरांना आदरांजली वाहण्यात‌ आली.

या प्रसंगी सैन्यदल भरती पूर्व सराव करणाऱ्या तरुणांनी कठोर मेहनत करून देशसेवेत भरती होण्याचा संकल्प केला, तर नेहरू युवा केंद्राचे येवला तालुका युवा राष्ट्रीय स्वयंसेवक रवींद्र बिडवे यांनी लवकरच युवा मंडळाची स्थापना करून तरुणांच्या सहकार्याने वाचनालय‌ सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. सदर कार्यक्रम नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, कोषाध्यक्ष सुनील पंजे, दिलीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सुभाष‌ कदम, रमेश कदम, अक्षय कदम, समाधान कदम, प्रमोद बोराडे, सुरज कदम, उमेश बोराडे, विनय बोराडे व सैन्य दल भरती‌पूर्व सराव करणारे युवक‌ उपस्थित होते.

Web Title: Kargil Victory Day Neuragavi Tree Plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.