कपिलधारा तिर्थावर दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:22 IST2017-10-07T01:21:59+5:302017-10-07T01:22:34+5:30

इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथे होम हवन, महाआरती तसेच महाप्रसादाच्या कार्यक्र माचे नियोजन करून कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्र म साजरा करण्यात आला.

Kapiladhara Teerth Deeprupsav | कपिलधारा तिर्थावर दीपोत्सव

कपिलधारा तिर्थावर दीपोत्सव

घोटी : इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथे होम हवन, महाआरती तसेच महाप्रसादाच्या कार्यक्र माचे नियोजन करून कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्र म साजरा करण्यात आला.
कावनई येथे कपिलधारा पॉलेटेक्निकचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कावनई येथील मंदिरात होमहवनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला,. रात्री प्रमुख कुंडावर शेकडो दिवे तेजोमय करून सोडण्यात आले. कपिलधारा आश्रमाचे प्रमुख फलाहारी बाबा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर घोटी शहर व परिसरातील भाविक कार्यक्रमास उपस्थित होते. रात्रीच्या मोकळ्या आकाशात चंद्राच्या प्रतिबिंबास साक्षी ठेवून अत्यंत सुंदर व आकर्षक पद्धतीने कुंडाची सजावट करून, लक्ष वेधून घेणाºया नेत्रदीपक दिव्याच्या उजेडात महाआरती करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कपिलधारा पॉलिटेक्निकचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप चौधरी, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी आदींनी विशेष नियोजन केले.

Web Title: Kapiladhara Teerth Deeprupsav