फुलेनगरमध्ये कानिफनाथ उत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:50 IST2019-04-03T18:50:14+5:302019-04-03T18:50:42+5:30
सिन्नर : तालुक्यातील वावीजवळील फुलेनगर (माळवाडी) येथे तीन दिवसीय श्री कानिफनाथ महाराज उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

फुलेनगरमध्ये कानिफनाथ उत्सव सोहळा
फुलेनगर येथे भव्य कानिफनाथ महाराज मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता अभिेषक व महाआरती, सायंकाळी ५ ते ६ घटस्थापना, रात्री आठ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता ह. भ. प. तुकाराम महाराज घुगे (पिंपळगाव निपाणी) यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दि. ६ रोजी सकाळी ६ वाजता महाआरती, सकाळी ११ वाजता होमहवन, दुपारी ३ वाजता काठी महाल व पालखी मिरवणूक, रात्री ९ वाजता ह. भ. प. काशिकानंद महाराज शिर्डी यांचे कीर्तन होणार आहे. रविवार (दि. ७) रोजी सकाळी ९ वाजता ह. भ. प. देवकर महाराज मिरगाव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर डफवाद्याचा व देव खेळण्याचा कार्यक्रम होणार आहे. परिसरातील भाविकांनी या विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ओम चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळ व फुलेनगर ग्रामस्थांनी केले आहे.