कानडे मारुती लेनमध्ये पर्स लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:48+5:302021-02-05T05:38:48+5:30

याप्रकरणी सविता अनिल सूर्यवंशी (रा. शिवरामनगर, टाकळीरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सूर्यवंशी या शुक्रवारी (दि. ...

Kanade stretched the purse in Maruti Lane | कानडे मारुती लेनमध्ये पर्स लांबविली

कानडे मारुती लेनमध्ये पर्स लांबविली

याप्रकरणी सविता अनिल सूर्यवंशी (रा. शिवरामनगर, टाकळीरोड) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सूर्यवंशी या शुक्रवारी (दि. २९) खरेदीसाठी मेनरोड भागात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या कानडे मारूती लेन भागातील एका दुकानासमोर खरेदी करत असताना ही घटना घडली. अज्ञात महिलांनी बाजारपेठेतील गर्दीची फायदा घेत त्यांची नजर चुकवून त्यांच्या पिशवीतील पर्स चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----

पादचारी वृध्देचे मंगळसूत्र ओरबाडले

नाशिक : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना मखमलाबादरोडवरील गुलमोहरनगर भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनंदा लक्ष्मण घुमरे (७०, रा. मखमलाबादरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घुमरे या शुक्रवारी (दि. २९) संध्याकाळच्या सुमारास परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. फेरफटका मारून घराकडे परतत असताना ही घटना घडली. त्या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----

आजारी आईला सावत्र मुलाकडून मारहाण

नाशिक : रुग्णालयातून उपचार घेऊन परतलेल्या आईला मारहाण केल्याची घटना आरटीओ कॉर्नर भागात घडली. ही घटना पैशांच्या मागणीतून घडली असून, यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्माण वामन पवार (२७, रा. कस्तूरबानगर झोपडपट्टी) असे संशयित सावत्र मुलाचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी शीतल पवार (६२ रा. गोरक्षनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार या आजारी असल्याने त्या एका रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होत्या. शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी त्या उपचार घेऊन घरी परतल्या असता ही घटना घडली. घरात त्यांना संशयित सावत्र मुलाने ढकलून देत त्यांच्या डोक्यात पाठीमागून काहीतरी वजनी वस्तूने प्रहार केला. यावेळी त्या जमिनीवर कोसळल्या असता संतप्त संशयिताने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ‘मला २५ लाख रुपये द्या, नाही तर तुमचा बेत पाहतो’, अशी धमकी देत पोबारा केला. या घटनेत पवार यांच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-----

बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

नाशिक : पाणी देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन बालिकेला जवळ बोलावून घेत एका ५७ वर्षीय संशयित इसमाने विनयभंग केल्याची घटना सातपूर कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित सुनील भाटे (रा. सम्यक चौक) यास पोलिसांनी अटक केली आहे. भाटे याने शुक्रवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. परिसरातील अल्पवयीन मुलीस संशयिताने आपल्या घरात बोलावून घेत पाणी आणण्यासाठी सांगितले. यावेळी मुलगी स्वयंपाकघरात गेली असता संशयिताने दरवाजा लावून घेत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Kanade stretched the purse in Maruti Lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.