कमलेश घुमरेचा कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:58+5:302021-07-09T04:10:58+5:30
कमलेशने फवारणी यंत्र, टोकण यंत्र व मॉडीफाईड केलेल्या ट्रॅक्टरची सर्व माहिती दिली. याप्रसंगी राहुरी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांची ...

कमलेश घुमरेचा कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरव
कमलेशने फवारणी यंत्र, टोकण यंत्र व मॉडीफाईड केलेल्या ट्रॅक्टरची सर्व माहिती दिली. याप्रसंगी राहुरी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांची कमलेशच्या कामाविषयी चर्चा केली. कृषी क्षेत्रात कमलेशचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. राज्याला अशा युवा होतकरू शेतकऱ्यांची गरज आहे. कृषी विद्यापीठ नक्कीच याची दखल घेऊन कमलेशला भविष्यात मदत करेल, असा शब्द भुसे यांनी यावेळी दिला. यावेळी कमलेश व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अशोक शिंदे, नानाजी घुमरे, भिकन महाडिक, संभाजी घुमरे, अमोल महाडिक, गंभीर घुमरे, सुनील चिकने, एकनाथ घुमरे, दिलीप चिकने, रामभाऊ चिकने, मोहन मांडोळे, आदी उपस्थित होते.
फोटो- ०८ कपाशी
कपाशी टोकण यंत्र तयार करणाऱ्या कमलेश घुमरेच्या शेतात प्रात्यक्षिक करताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत शेतकरी उपस्थित होते.
080721\08nsk_37_08072021_13.jpg
फोटो- ०८ कपाशी कपाशी टोकण यंत्र तयार करणाऱ्या कमलेश घुमरेच्या शेतात प्रात्यक्षिक करतांना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत शेतकरी.