भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीसपदी कांबळे, तालुकाध्यक्षपदी दोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 16:42 IST2020-12-21T16:41:41+5:302020-12-21T16:42:54+5:30
सिन्नर : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी राजू कांबळे यांची तर अनुसूचित जाती मोर्चा सिन्नर तालुका अध्यक्षपदी विजय दोडके यांची नियुक्ती करण्यात आली.

भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या सरचिटणीसपदी कांबळे, तालुकाध्यक्षपदी दोडके
खासदार भारती पवार, आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनातून अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे यांनी कांबळे व दोडके यांना नियुक्ती पत्र दिले. याप्रसंगी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिन गोळेसर, योगेश जाधव, हितेश वर्मा, संतोष कमलू, अतुल गुजराथी, डॉ. श्रीमाळी, दर्शन भालेराव, सविता कोठूरकर, चंद्रकला सोनवणे, उर्मिला लासूरकर, हनुमान निसरड, बंडू बाबर, रवींद्र कांबळे, काळूराम देडे, गणेश अस्वरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.