कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:11 IST2017-11-30T23:48:22+5:302017-12-01T00:11:46+5:30

शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला

Kalvan: Rohit, who has been obstructing the road demanding the removal of unnecessary pillars by polling the electricity company | कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले

कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले

कळवण : शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे. याबाबत लोकमतने सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता. सदरच्या वृत्ताची दखल घेत वीज वितरण कंपनीने रोहित्र हटविाले आहे. वीज कंपनीने शहरात सर्वेक्षण करून गरज नसताना उभे असलेले
खांब हटविण्याची गरज असल्याचे मत कळवणकर जनतेने व्यक्त केले आहे.
कळवण नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर भागातील डॉ. सुभाषचंद्र न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिरादरम्यान रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व डांबरीकरणांतर्गत कामास पावसाळ्यानंतर पुन्हा सुरुवात झाल्याने शिवाजीनगरकरांच्या चेहºयावर समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या रस्त्यावर बीके कॉम्प्लेक्ससमोर रस्त्यातच असलेले रोहित्र रस्त्याच्या विकासाला व वाहतुकीला अडथळा ठरत होते. अखेर २० वर्षांनंतर ते तेथून हटविल्याने पादचारींनी व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. नगर पंचायतचे गटनेते कौतिक पगार, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार, तहसीलदार कैलास चावडे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, शेतकरी सहकारी संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण गांगुर्डे यांनी आज घेतलेल्या पुढाकारातून रस्त्यावरील रोहित्र हटविण्यात आल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. नगरपंचायत असलेल्या कळवणचा दिवसागणिक विस्तार शहराच्या चारही बाजूने वाढत असल्याने लोकसंख्यादेखील वाढली आहे. त्याबरोबरच शहरात वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. आता शहरातील रस्तेदेखील अपुरे पडू लागल्याने रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरण करण्याच्या कामावर कळवण नगरपंचायतने भर दिला आहे. आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या सहकार्याने कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार व गटनेते कौतिक पगार यांनी विशेष लक्ष घालून दुर्लक्षित रस्त्याकडे लक्ष केंद्रित केल्याने नगरपंचायत हद्दीतील विविध भागातील रस्त्यांवरील वाहतुकीला वीज वितरण कंपनीने वीज पुरवठ्यासाठी उभारलेले विजेचे खांब हे अडथळा ठरू पहात असल्याने आता त्यांचे सर्वेक्षण करून खांब काढण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. शिवाजीनगरमधील बीके कॉम्प्लेक्ससमोर उभे असलेले रोहित्र वाहतुकीला अडचणीचे ठरत असल्याने व रोहित्र रस्त्याजवळच असल्याने रस्त्याने जाताना जीव मुठीत धरूनच पादचाºयांना प्रवास करावा लागत होता. शिवाय तेथून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न व अन्य कार्याच्या वेळी या रोहित्राच्या भोवताली वाहनाची मोठी गर्दी होत होती. शिवाय दुतर्फा वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. शिवाजीनगरमधील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम कळवण नगरपंचायतने हाती घेतले असल्याने या रस्त्यांच्या रुंदीकरणाला अडथळे निर्माण ठरणारे रोहित्रासह विजेचे खांब अन्यत्र हलविण्यात वीज वितरण कंपनीला महसूल व नगरपंचायत, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या मदतीने यश आले आहे. शिवाजीनगर भागातील वीजपुरवठ्याचे वीज वितरण कंपनीने नियोजन करून वीज खांबांचे सर्वेक्षण करून येथील अनावश्यक खांब हटवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Kalvan: Rohit, who has been obstructing the road demanding the removal of unnecessary pillars by polling the electricity company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.