कळवण : नगरपंचायत प्रारु प प्रभाग रचनेत ज्या प्रभागात अनुसूचित जाती व जमाती मतदार जास्त आहेत ते प्रभाग आरिक्षत करणे गरजेचे असल्याने नाशिकचे उपजिल्हाधिकारी प्रदीप भोये व तहसीलदार अनिल पुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी काढण्यात आलेल्या कळवण नगरपंचायतच्या फेरआरक्षणात सर्व प्रभागांचे आरक्षण बदलून गेले असून नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्याने इच्छुक कामाला लागले या फेरआरक्षणात प्रभाग क्र ६ अनुसूचित जाती तर प्रभाग क्र ९ अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आला तर प्रभाग क्र १० व १४ अनुसूचित जमाती महिला तर प्रभाग १२ व १७ अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आला आहे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी प्रभाग क्र १ ,३ व ४ हे महिलांसाठी राखीव करण्यात आले असून प्रभाग क्र २ व ७ नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी आहे प्रभाग क्र ं ५ ,८ व १६ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले असून प्रभाग क्र ११,१३ व १५ हे सर्वसाधारण करण्यात आले आहे यामुळे शिवाजीनगर ,गणेशनगर ,रामनगर ,फुलाबाई चौक ,संभाजीनगर,गांधी चौक येथील होणाऱ्या निवडणुका रंगणार असेच चित्र आता दिसू लागले आहे
कळवण नगरपंचायत : इच्छुकांची तयारी सुरुसर्व प्रभागांचे आरक्षण बदलले
By admin | Updated: August 23, 2015 22:25 IST