शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

‘कालिदास’ डिपॉझिट जप्तीचा निर्णय अखेर रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:51 AM

‘लोकमत’ने गत आठवडाभरापासून लावलेल्या ‘नूतनीकरण अन् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेची दखल घेत कार्यक्रम रद्द झाल्यास आयोजकांनी भरलेली संपूर्ण अनामत रक्कम (डिपॉझिट) परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : ‘लोकमत’ने गत आठवडाभरापासून लावलेल्या ‘नूतनीकरण अन् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेची दखल घेत कार्यक्रम रद्द झाल्यास आयोजकांनी भरलेली संपूर्ण अनामत रक्कम (डिपॉझिट) परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कालिदास कलामंदिराच्या पूर्णवेळ देखरेखीसाठी सहायक व्यवस्थापकाचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.रंगकर्मींच्या अनेक महिन्यांपासूनच्या पाठपुराव्यानंतरही मनपा प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत होत्या. अखेरीस १५ आॅगस्टला नूतनीकरणाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने लोकमतने ‘नूतनीकरण अन् खच्चीकरण’ या वृत्तमालिकेद्वारे कालिदासमधील उणिवांवर नेमकेपणाने बोट ठेवत रंगकर्मींच्या आणि नाट्य व्यावसायिकांच्या व्यथा मांडल्या. त्यानंतर प्रशांत दामले, सुप्रिया पाठारे आणि विजय पाटकर यांनीदेखील महापालिकेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढल्याच्या वृत्तालादेखील मालिकेतून प्रसिद्धी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली.नूतनीकरणानंतर केलेल्या नियमावलीतील त्रुटी निदर्शनास आल्याने कालिदासच्या नियमावलीत बदल करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वतीने सायंकाळी जाहीर करण्यात आले. तसेच नाट्यकर्मी, सामाजिक संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमावलीत आणि दरपत्रकात अन्य काही आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच कालिदासच्या देखरेखीसाठी सहायक व्यवस्थापकाची देखील नेमणूक करण्यात आली आहे. कालिदास कलामंदिराबाबत यापूर्वी मंजूर नियमावलीच्या तरतुदीनुसार कार्यक्र मासाठी आयोजकांनी केलेले आरक्षण रद्द करायचे झाल्यास कार्यक्र मासाठी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येत होती. त्या तरतुदीत दुरुस्ती करून आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण अनामत रक्कम परताव्याची तरतूद करणेत आली आहे.दरात कपातीचा प्रस्तावया व्यतिरिक्त महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालन यांचे दरदेखील सुसह्य करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. त्याशिवाय नियमावलीतही काही आमूलाग्र बदल करण्याचा विचार असल्याचे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcultureसांस्कृतिक