कालभैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:29 IST2019-05-07T19:28:18+5:302019-05-07T19:29:08+5:30
अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

कालभैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात
अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
’कालाष्टमी (दि.२६) पासून काल भैरवयात्रा ही उत्साहात सुरु वात झाली. गावातच मुळात पाणी टंचाई त्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील भाविकांमुळे यात्रौत्सव कालावधीत अधिकच पाणी टंचाई जाणवणार म्हणून ग्रामपंचायत व ग्रामसथ भयभीत झाले होते. तसे ह्या वर्षी दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पण सामाजिक संस्था, व व्यक्ती पुढे आल्याने हा प्रश्न सुटला.
यात्रौत्सव कालावधीत प्रामुख्याने येवला मार्केट कमेटी, जनता सहकारी बँक, संजीवनी साखर कारखाना, कांदा असोसिएशन, महिला पतसंस्था, त्याच प्रमाणे नंदू अट्टल, बाळू संचेती, श्रीकांत काबरा तसेच राधाअप्प सोनवणे, समीर देशमुख, नामदेव भिंगारे, करंजी, विजय दारु टे यांनीही पाण्याच्या टँकरची मदत केली.
त्या सोबतच प्रशासनाने ही हे सर्व टँकर पाणी भरून देण्यासाठी सहकार्य केले.
तसेच येणाºया सर्व पाण्याचे नियोजन ग्रामपंचायत व गावातील सेवाभावी कार्यकर्ते यांनी केले व भविकांपर्यंत पाणी पोहचवले कोठेही पाण्याची अडचण भासु दिली नाही. त्याकरीता दिगंबर भागवत, भाऊसाहेब खामकर, समाधान खामकर यांनी सहकार्य केले. जिल्हापरिषद सदस्य महेंद्र काले, उपसरपंच प्रताप दाभाडे ग्रामसेवक भाऊराव मोरे, पोलिस पाटील सुरेश दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी यात्रोउत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.