काकाणी विद्यालयांच्या क्रीडामहोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:01 IST2019-12-14T22:58:03+5:302019-12-15T01:01:48+5:30

मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला.

Kakani school sports festival begins | काकाणी विद्यालयांच्या क्रीडामहोत्सवास प्रारंभ

काकाणी विद्यालयाच्या क्रीडामहोत्सवाचे क्रीडा ज्योत पेटवून उद्घाटन करताना संस्थेचे चेअरमन नितीन पोफळे. समवेत संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित, भोगीलाल पटेल, प्राचार्य तुकाराम मांडवडे, शोभा मोरे, कविता मंडळ, नरेश शेलार आदी.

ठळक मुद्देमालेगाव । शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

संगमेश्वर : येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन नितीन पोफळे, संचालक भोगीलाल पटेल, प्राचार्य तुकाराम मांडवडे, मुख्याध्यापक शोभा मोरे, कविता मंडळ, उपप्राचार्य नारायण चौधरी, पर्यवेक्षक अनिल गोविंद, राजेंद्र परदेशी, क्र ीडाशिक्षक नरेश शेलार हजर होते. विद्यालयातील राष्ट्रीय, राज्य व विभागीय स्तरावर क्र ीडा स्पर्धेत विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या स्नेहल वाणी, गौरी साइनकर, जयेंद्र महाजन तसेच आजी व माजी विद्यार्थ्यांसह खेळाडूंनी क्रीडा ज्योत काकाणी विद्यालयात आणली. खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, कुलूपकिल्ली खेळांचे सामने झाले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळत असतो. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जातो.

Web Title: Kakani school sports festival begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा