संताजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:44 IST2019-06-18T17:44:16+5:302019-06-18T17:44:31+5:30
येवला : आवर्तनानुसार रिक्त जागेवर बिनविरोध निवड

संताजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास चौधरी
येवला : येथील श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. कैलास चौधरी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिल घटे यांची बिनविरोध निवड झाली. माजी चेअरमन कृष्णा क्षीरसागर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी संस्थेच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
चेअरमन पदासाठी कैलास चौधरी यांच्या नावाची सूचना संचालक विजय क्षीरसागर यांनी मांडली. या सूचनेला संचालक किरण घाटकर यांनी अनुमोदन दिले. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक बोरसे यांनी कामकाज पाहिले. निवडी नंतर मावळते चेअरमन कृष्णा क्षिरसागर यांनी नवनियुक्त चेअरमन कैलास चौधरी व व्हाईस चेअरमन अनिल घटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रा. कैलास चौधरी यांनी संस्था व सभासद यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व संचालक मंडळाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संचालक सूर्यकांत महाले, सौ.विनता घाटकर, सौ.छाया वालझाडे, महेश जाधव, कुणाल क्षिरसागर, संजय गांगुर्डे, व्यवस्थापक सुनील भांबारे आदी उपस्थित होते.