गोसराणे ग्रामपंचायत सरपंचपदी कैलास थैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 00:16 IST2021-02-17T23:35:29+5:302021-02-18T00:16:41+5:30
अभोणा : ग्रामविकासाचे धेय्य समोर ठेऊन कुठल्याही प्रकारचा विरोध न करता निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या संमतीने बेलबारे, बार्डे या गावांचा समावेश असलेल्या गोसराणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास हरी थैल तर उपसरपंचपदी मुरलीधर आनंदा मोरे यांची निवड करण्यात आली.

गोसराणे ग्रामपंचायत सरपंचपदी कैलास थैल
अभोणा : ग्रामविकासाचे धेय्य समोर ठेऊन कुठल्याही प्रकारचा विरोध न करता निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या संमतीने बेलबारे, बार्डे या गावांचा समावेश असलेल्या गोसराणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलास हरी थैल तर उपसरपंचपदी मुरलीधर आनंदा मोरे यांची निवड करण्यात आली.
अध्यासी अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी महाले यांच्या मार्गदर्शनात तलाठी श्रीमती एम. एच. पवार, ग्रामसेवक पी. पी. पवार, निलेश मोरे यांनी निवडणूक कार्यक्रम पार पाडला. यावेळी सदस्य रजनी गांगुर्डे, मालती भदाणे, अरुणा साबळे, रमण बहिरम, निंबाबाई अहिरे यांचेसह शिवराम थैल, दादाजी मोरे, प्रभाकर वाघ, बाळासाहेब मोरे, माणिक थैल, प्रदिप वाघ, विश्वनाथ थैल आदी उपस्थित होते.