कडू यांच्या बैठकांवर अधिकारी टाकणार बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 15:21 IST2017-07-25T15:21:13+5:302017-07-25T15:21:13+5:30
अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५) काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला

कडू यांच्या बैठकांवर अधिकारी टाकणार बहिष्कार
नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारत त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या कोणत्याही बैठकांना यापुढे उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकारी संघटनेने घेतला आहे. त्याबाबतचे निवेदनही विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली.
आयुक्त अभिषेक कृष्ण यांना शहराबाहेरील लोकप्रतिनिधीने केलेली शिवीगाळ व धमकाविल्याबद्दल मनपातील सर्व अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५) काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला. आवश्यकता वाटल्यास बुधवारी (दि.२६) लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.