कपालेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकास मारहाण

By Admin | Updated: January 28, 2017 01:12 IST2017-01-28T01:12:39+5:302017-01-28T01:12:55+5:30

कपालेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकास मारहाण

Kadaleshwar temple guard beaten up | कपालेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकास मारहाण

कपालेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकास मारहाण

 नाशिक : शिटी वाजविल्याची कुरापत काढून कपालेश्वर मंदिराच्या सुरक्षारक्षकास मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़ २५) रात्रीच्या सुमारास घडली़
राजेंद्र खैरनार (२४, रा़ बालाजी होस्टेल, आडगाव नाका, पंचवटी) हे कपालेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकाचे काम करतात़ रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित दिलीप शृंगार व त्याच्या दोन साथीदारांनी शिटी वाजविल्याची कुरापत काढून खैरनार यांना शिवीगाळ करीत मारहाण केली़
या प्रकरणी शृंगार व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Kadaleshwar temple guard beaten up